तालुका अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात पहील्यांदाच कवडी शाळेने सांस्कृतिक कार्यक्रमात मारली बाजी….
♦️वैयक्तिक व सामूहिक नृत्यात विद्यार्थी आले तालुक्यात प्रथम

♦️वैयक्तिक व सामूहिक नृत्यात विद्यार्थी आले तालुक्यात प्रथम
आमगाव, (दि. 24): तालुक्यातील जि. प. उच्च प्रा. शाळा ननसरी, सरकारटोला च्या भव्य प्रांगणात दि. 20 ते 23 डिसेंबर 2025 या कालावधीत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कवळी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नृत्य, समूहगीत, नाट्यछटा तसेच लोककलेच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा प्रभावी आविष्कार केला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात शिस्त, तालबद्धता आणि विषयाची प्रभावी मांडणी दिसून आली. परीक्षकांनीही कवळी शाळेच्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत उच्च गुण प्रदान केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कवळी शाळेने सांस्कृतिक कार्यक्रमात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल नोहरलाल चौधरी पंं.स.सदस्य, योगिता ताई पटले सरपंच व समस्त गावकरी बांधव यांनी अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमराज पटले , उपाध्यक्ष वैभव वालदे, सदस्य हौसलाल रहांगडाले, योगेश कुमार भोस्कर,सरिता चौधरी,रंजु मेश्राम,प्रतीभा मडावी,दिक्षा भावे,शुजाता शहारे, संगिता ठाकरे,आरती रहांगडाले, जितेंद्र टेंभुर्णीकर,अजय टेंभूर्णीकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ब्राम्हणकर, शिक्षक के.आर.रहागंडाले, मुकेश बघेले, एन एन जाधव, स्वयंसेवक दिप्ती बघेले, नरेंद्र मेश्राम, निशा रहांगडाले , सांस्कृतिक शिक्षक व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. कवळी शाळेच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक जिल्हा पातळीवर वाढला असून सर्वत्र कौतुक होत आहे. उद्यापासून बोन्डगावं देवी ता. अर्जुनी मोर येथे सुरु होणाऱ्या जिल्हा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कवडी शाळा आमगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.







