राज्यातील आयडॉल शिक्षकांची राज्यस्तरीय कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर येथे आज; गोंदिया जिल्ह्यातील 15 शिक्षकांची निवड

गोंदिया, (दि. 4 डिसें): विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळाना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील आयडॉल शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि.०४/१२/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात घेण्यात येणार असून शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत. तसेच मुख्य अतिथी मध्ये राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, MPSP चे प्रकल्प संचालक संजय यादव, SCERT चे संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे उपस्थित राहणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील 15 शिक्षकांची निवड – या कार्यशाळेसाठी गोंदिया जिल्ह्यातील 15 आयडॉल शिक्षकांची निवड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून तालुक्यातील आलेल्या यादीवरून गुणांनुक्रमे करण्यात आली आहे. यामध्ये राजकुमार बागडे, लीलाधर बघेले (तिरोडा), सौ. अनिता फब्ब्यानी, प्रल्हाद पारधी (गोंदिया), सौं. नीता तोमर, पी. टी. परशुरामकर (गोरेगाव), कैलास कुसराम, विनोद बनकर (सडक अर्जुनी), पुरुषोत्तम गहाणे, विठोबा रोकडे (अर्जुनी मोर), नरेंद्र अमृतकर, डिलेश टेटे (देवरी), खुमेशकुमार कटरे (सालेकसा), सुरेंद्र मेंढे, मुनेश्वर जैतवार (आमगाव), या निवडीबद्दल सर्वांचे जिल्ह्यात अभिनंदन होतं आहे.
Live कार्यशाळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇







