आरोग्य व शिक्षण

हुतात्मा दिनी विद्यार्थ्यांनी शाळेला दिली अनोखी भेट; बक्षीसाच्या रकमेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी व राजमाता जिजाऊ यांची फोटो दिली भेट….

गोंदिया, (दि. ३०): गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात अटल क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुरदोली चे विद्यार्थी देखील सहभागी होते. उच्च प्राथमिक गटातून अवघे नऊ विद्यार्थी संख्या असतांना अप्रतिम अशी कव्वाली सादर करीत जिल्हास्तरापर्यंत छाप सोडली. विशेष बाब अशी की प्रेक्षकांना कव्वाली खूप आवडल्याने बक्षीसांचा वर्षाव झाला. मुलांनी मिळालेल्या बक्षीसाची रक्कम स्वतःकडे न घेता ती शिक्षकांकडे सुपूर्द केली. आणि त्या रक्कमेतून शाळेकरीता महात्मा गांधीजी आणि राजमाता जिजाऊ यांची फोटो शाळेला भेट दिली.

मागील वर्षी देखील या मुलांनी स्वतःची बक्षीसाची रक्कम शाळेला तीन घड्याळ भेट देत दान केली होती.
याबद्दल मुलांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, केंद्रप्रमुख मधुकर राऊत, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती व मुरदोली येथील गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि अशा गुणवान, मूल्यवान विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया शाळेतील शिक्षक लोकनाथ तितराम मुख्याध्यापक, दिनेश सोळी, अमोल खंडाईत यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यां वर होणाऱ्या मूल्यवर्धक संस्काराचे प्रतिबिंब या घटनेतून दिसून येते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.