राज्यस्तरीय विनर ऑफ द इअर (विजेता) स्पर्धा परीक्षा आज; गोंदिया जिल्ह्यातील 400 विद्यार्थी देणार 9 केंद्रातून परीक्षा….

गोंदिया, (दि. 28) : शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी, भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, शालेय अभ्यासक्रम किती आत्मसात झाला, किती क्षमता प्राप्त झाल्या व शालेय अंतिम परीक्षेत अपेक्षित यश मिळावे या उद्देशाने ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा तर्फे दरवर्षी राज्यस्तरीय विनर ऑफ द इयर (विजेता) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यावर्षी या स्पर्धा परीक्षेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. सदर विनर ऑफ द इयर ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आज दिनांक 1 मार्च 2026 ला होणार असून यामध्ये जिल्ह्यातील एकूण 400 विद्यार्थी सहभागी झाले आहेत, अशी माहिती ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.

विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ही इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य बोर्डाच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासाठी घेतली जाते. सदर परीक्षा ही शालेय अभ्यासक्रमावर आधारित असून यामध्ये इयत्तानिहाय विषयावर प्रश्न विचारले जातात. सर्व विषयांचे मिळून एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी दिले जातात. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला 51 हजार, द्वितीय क्रमांकाला 21 हजार, आणि तृतीय क्रमांकाला 11 हजार रुपयांचे पारितोषिक शिष्यवृत्तीच्या रूपात मिळणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात विनर ऑफ द इयर परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून एकूण 9 परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण परीक्षा ही ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे व ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे, उपप्रमुख मीनल टेंभरे, आमगाव तालुका प्रतिनिधी धनराज भगत, सडक अर्जुनीचे अनिल वैद्य, सालेकसा चे शिक्षक महेंद्र पटले, देवरीचे अमोल सवासे, तिरोडाचे शुभांगी चौधरी, राजश्री बनसोडे, गोंदियाचे समीर तिडके, आमगाव तालुका सारिका मडावी, देवेंद्र बागडे, कोरची जि. गडचिरोलीच्या आरती चांदेकरसह इतर शिक्षक परीक्षेसाठी सहकार्य करीत आहेत.
हे आहेत परीक्षा केंद्र :-
1. जानकीदेवी चौरागडे हायस्कुल कुडवा, गोंदिया
2. जि. प. व. प्रा. शा. इंदोरा खु. ता. तिरोडा
3. PMSHRi राणी अवंतिबाई न. प. प्रा. शा. लोधीटोला ता. तिरोडा
4. जि. प. व. प्रा. शा. मोहगाव ता. आमगाव
5. PMSHRi जि. प. व. प्रा. शा. ठाणा ता. आमगाव
6. जि. प. प्रा. शा. सिंगाटोला ता. सालेकसा
7. जि. प. हायस्कूल देवरी, ता. देवरी
8. जि. प. हायस्कुल, सडक अर्जुनी ता. सडक अर्जुनी
9. PMSHRi जि. प. व. प्रा. शा. कोरची, ता. कोरची जि. गडचिरोली.
मागील वर्षीचा निकाल

आय एम विनर परीक्षा 2024 निकाल








