जिल्हा

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर… आमदार विनोद अग्रवाल.

♦ जैन कलार समाजाचा स्नेह संमेलन, महिला मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार साजरा....

गोंदिया को कचरामुक्त करके स्वच्छ एवं सुंदर बनायेंगे- नवनियुक्त नगराध्यक्ष सचिन शेंडे

गोंदिया, (दिनांक 3):- स्थानिक जैन कलार समाजाने सामाजिक हिताचे अनेक कार्य केले आहे. समाजासाठी त्यागाची भावना ठेवत समाजाचे अध्यक्षासह सर्व कार्यकारीणीच्या सदस्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापुढे आदर्श निर्माण केले. समाज भवनाची स्थापना केली. समाज भवनाला सुशोभित करण्यासाठी 20 लाख रुपयाची घोषणा करुन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. 

जैन कलार समाज गोंदियाच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन व महिला मेळावा दि. 1 फेब्रुवारी Hdfc समाजाच्या सांस्कृतिक भवनात करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचा उद्घाटक या स्थानावरुन आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष श्री चंद्रशेखर आदमने हे होते. तर दिप प्रज्वलक म्हणून गोंदिया नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष सचिन शेंडे, जिल्हा परिषद गोंदियाचे महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पोर्णिमा ढेंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. कलार समाजाचे अध्यक्ष श्री मुकेश शिवहरे, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूर चे उपाध्यक्ष शशिकांत समर्थ, संचालक सुखराम खोब्रागडे, शैलेश दहीकर, संजय शिरपूरकर, स्वप्नील समर्थ, संचालिका डाॅ छायाताई दुरुगकर, नागपूर जिल्हा समिती अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, उपाध्यक्ष सुरेखा अहिरकर, तिरोडा नगर सेवक सुनिल पालांदूरकर, भंडारा प्रयास संस्थेचे कार्याध्यक्ष राजेन्द्र बनसोड, पं. स. सदस्य शैलजा सोनवाने, चंद्रकला ठवरे, नागपूर महिला समिती अध्यक्षा विद्या समर्थ, संचालिका संगीता अतकर, रश्मी शिवनकर, ममता समर्थ, जैन कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे, सचिव शालिकराम लिचडे, उपाध्यक्ष शोभेलाल दहिकर, विणा सोनवाने, विजय ठवरे, प्राजक्ता रणदिवे, हर्षा आष्टीकर, गोपाल हजारे, वरुण खंगार व विजय कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात माता जैनादेवी, समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहु व दानदाता स्व. उकाजी ठवरे याच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करुन करण्यात आले. प्रास्ताविक समाजाचे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे यांनी केले. त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असी आर्थिक मदत मिळण्पासासाठी जनप्रतिनिधी, नागपूर मध्यवर्ती मंडळ व समाज बांधवांना आव्हान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या नियोजनाची व केलेल्या कार्याचे कौतुक केले. 

गोंदिया को कचरामुक्त करके स्वच्छ एवं सुंदर बनायेंगे- नवनियुक्त नगराध्यक्ष सचिन शेंडे

         गोंदिया नगर परिषदेचे  नवनियुक्त नगराध्यक्ष सचिन शेंडे हे या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी जैन कलार समाजाने मला नगराध्यक्ष होण्याकरिता खूप मदत केली त्याबद्दल समाजाचे मी नेहमी ऋणी राहणार व वेळोवेळी समाजाच्या पाठीशी राहणार तसेच समजभवनात CCTV कॅमेरे नगर परिषदेकडून लावण्यास प्रयत्न करणार असे प्रतिपादन सचिन शेंडे यांनी केले. तसेच समाजाच्या सहकार्याने सर्वांनी गोंदिया शहराला कचरामुक्त करून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवूया असे आवाहन देखील गेले. करिता नगरपरिषदेने 100 दिवसांचा प्लान तयार केला असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

कार्यक्रमाचे बहारदार असे संचालन वशिष्ठ खोब्रागडे व यशोधरा सोनवाने तर आभार प्रदर्शन महिला समिती अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे यांनी केले. यावेळी एकल नृत्यामधे प्रथम क्रमांक सुप्रिया मोरघडे, द्वितीय विद्या सोनवाने तर काव्या सोनवाने नी तृतीय क्रमांक व सामुहीक नृत्यात अल्का ग्रुप प्रथम, माय लेकी ग्रुप द्वितीय तर अथर्व ग्रुप तृतीय क्रमांक प्राप्त करणा-यांना गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थांमध्ये वर्ग 10 वी चे रुतुजा सोनवाने, तन्मय दहीकर, वैदही भांडारकर, आयुषी सोनवाने, तेजस भदाडे तर 12 वी चे पारस रहमतकर, पलक रेवतकर तसेच समाजाचे उत्कृष्ट कार्य करणा-या सर्व कार्यकारीणी सदस्यांचे मोमेंटो व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. यावेळी महीलांनी हळदी कुंकू व वाण वाटप केले. सर्वांनी भोजनाचा आश्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्य समिती, युवा समिती, महीला समिती व तेजराम मोरघडे, सुखराम हरडे, उमेश भांडारकर, धनपाल कावळे, अतुल खोब्रागडे, वशिष्ट खोब्रागडे, वासु सोनवाने, संजय मुरकुटे, राजकुमार पेशने, नामदेव सोनवाने, रोशन दहीकर, मनोज भांडारकर, प्रितिश रामटेक्कर, श्याम लिचडे, उल्हास सोनवाने, सचिन पालांदूरकर, देवानंद भांडारकर, अशोक भांडारकर, योगेश ईटानकर, मुकेश हजारे, दिपक रेवतकर, मंगेश रहमतकर, पंकज तिडके, सीमा ईटानकर, मनिषा हरडे, ज्योती किरणापूरे, गिता दहीकर, वर्षा तिडके, सुमन तिडके, अर्चना सोनवाने, रविकांता ईटानकर, ललीता हलमारे. मीनाक्षी रहमतकर, विजया हट्टेवार, अनिता मुरकुटे, उषा मोरघडे, वत्सला पालांदूरकर, पदमा भदाडे, महेंद्र सोनवाने, मनिष ठवरे, दिलीप हजारे, ओमप्रकाश भांडारकर यांनी अथक परिश्रम केले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.