आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यातील 1500 विद्यार्थी देणार आय एम विनर स्पर्धा परीक्षा; 18 परीक्षा केंद्र सज्ज…..

♦️ ध्येय एज्युकेशन फाउंडेशनची राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2026 ला 

 ♦️ ध्येय एज्युकेशन फाउंडेशनची राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2026 ला 

 गोंदिया, (दि. 25): शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी आणि भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी या उद्देशाने एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा तर्फे दरवर्षी राज्यस्तरीय आय एम विनर ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यावर्षी या स्पर्धा परीक्षेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. सदर आय एम विनर ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2026 ला होणार असून यामध्ये जिल्ह्यातील एकूण 1500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत, अशी माहिती ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे. 

 

 आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ही इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षा ही शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर भाषा/मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयावर आधारित असते. शिष्यवृत्ती परीक्षाप्रमाणेच या परीक्षेत देखील दोन पेपर होत असून विद्यार्थ्यांना वेळापत्रक व हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहेत. इयत्ता पहिली आणि दुसरी ला फक्त एकच पेपर होणार असून इयत्ता तिसरी ते दहावीला दोन पेपर होणार आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक ला 51 हजार, तृतीय क्रमांक ला 21हजार आणि चतुर्थ क्रमांकाला 11 हजार 100 रुपयांचे पारितोषिक शिष्यवृत्तीच्या रूपात मिळणार आहेत.

 

गोंदिया जिल्ह्यात आय एम विनर परीक्षेचे तयारी पूर्ण झाली असून एकूण 18 परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण परीक्षा ही ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे व ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे, उपप्रमुख मीनल टेंभरे, तालुका प्रतिनिधी धनराज भगत, अनिल वैद्य, बी. डी. चौधरी, कार्तिक पटले, शिक्षक मंगेश बोरकर, नरेंद्र अमृतकर, एस आर ताजने, सी डी हरिणखेडे, दिनेश अंबादे, यशवंत भगत, राजकुमार बागडे, शुभांगी चौधरी, श्रीमती राजश्री दहिवले मॅडम, कांतीलाल भेलावे, समीर तिडके, दीपिका सातपुते, किरण बनकर, स्मृती छपरिया मॅडम, सारिका श्रीवास्तव, राजेश कडुकर, संदीप खेडीकर, नितीन कुंभरे, आनंद सरवदे, श्रीकांत कामडी, स्नेहा रामटेके, सरिता घोरमारे, सारिका मडावी, संतोषसिंह नैकाने, शैलेश बागडे, प्राजक्ता रणदिवे, कोसमतोंडी चे श्री टेम्भूरणे, कापगते, कैलास कुसराम, मोरेश्वर बिसेन, सुशील भांडारकरसह इतर शिक्षक परीक्षेसाठी सहकार्य करीत आहेत. 

हे आहेत परीक्षा केंद्र- 

*तालुका गोंदिया*: 1) जानकीदेवी चौरागडे (JDC) हायस्कुल, रिंगरोड, हनुमाननगर, कुडवा, गोंदिया.         2) शारदा कॉन्व्हेंट अँड हायस्कुल, गणेशनगर, गोंदिया. 3)जिल्हा परिषद प्राथ. शाळा एकोडी.                         4) स्व. सारजाबाई भोयर हायस्कुल, दवनिवाडा 

*तिरोडा तालुका* :1) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. मनोरा. 2) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. खडकी/डों.      3) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. खैरलांजी 4) जिल्हा परिषद हायस्कुल, तिरोडा 

*आमगाव तालुका* : 1) श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, आमगाव. 2) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. तिगाव. 3) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. मोहगाव/कातूरली 

*देवरी तालुका*: 1) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. भागी/दे.

*सडक अर्जुनी तालुका* :1) जिल्हा परिषद हायस्कूल, सडक अर्जुनी. 2) फुलीचंद भगत हायस्कुल, कोसमतोंडी 

*अर्जुनी मोर तालुका* :1) जिल्हा परिषद प्रा. शाळा अर्जुनी नं. 1

*गोरेगाव तालुका* : 1) जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. घुमर्रा, 2) PMSHRI शहीद जा. तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव. 3) PMSHRI जिल्हा परिषद उच्च प्रा. शा तुमखेडा/खु.

 

 

निकाल 2024-25 (आय एम विनर )

निकाल 2024-25 (विनर ऑफ द इअर)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.