राज्यस्तरीय विनर परीक्षेचे निकाल जाहीर; जिल्ह्यातील 5 विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले
♦️दिनांक 29 तारखेला राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभात पालकांसह विद्यार्थ्यांचा होणार सत्कार ..

गोंदिया, (दि. 22): शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी आणि भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा तसेच शालेय अभ्यासक्रम किती आत्मसात झाला व शालेय अंतिम परीक्षेत अपेक्षित यश मिळावे या उद्देशाने ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा तर्फे दरवर्षी राज्यस्तरीय आय एम विनर व विनर ऑफ द इयर (विजेता) या दोन स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही स्पर्धा परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून जिल्ह्यातील 5 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण दिनांक 29 मार्च ला ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, पुणे येथे होणार असल्याची माहिती ध्येय एज्युकेशन फौंडेशनचे गोंदिया जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.

आय एम विनर ही परीक्षा मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या चार विषयावर इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते जी शासनाच्या शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, सैनिक स्कुल प्रवेश परीक्षेवर आधारित असते. ज्यामधून मुलांच्या स्पर्धात्मक बुद्धीला चालना मिळून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला तयार होतो. ही परीक्षा राज्यात एकाच वेळी दि. 4 जानेवारी ला झाली होती. तर विनर ऑफ द इयर ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असते जी दि. 1 मार्च ला घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकूण 1800 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. या परीक्षांचे नुकतेच निकाल जाहीर होऊन गुणवत्ता यादी प्रकाशित झाली. यामध्ये राज्यस्तर गुणवत्ता यादीत आय. एम. विनर परीक्षेत दोन विद्यार्थी तर विनर ऑफ द इयर परीक्षेत तीन विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार पुणे येथे होणार असून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे उपस्थित रहावे असे आवाहन ध्येय एजयुकेशन फौंडेशन चे संस्थापक सुदाम शेंडगे यांनी केले आहे.

हे आहेत राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी 👇👇
आय. एम विनर परीक्षा : 1) कु. निराली मनिष चापले, इयत्ता 5 वी, PMSHRI राणी अवंतिबाई न. प. प्रा. शा. लोधीटोला तिरोडा (राज्य रँक 4)
2) कु. श्रावणी संजय टेम्भरे, इयत्ता 10 वी, शारदा कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कुल, गणेशनगर, गोंदिया (राज्य रँक 2)
विनर ऑफ द इयर परीक्षा : 1) पूर्वार्ध वशिष्ठ खोब्रागडे, इयत्ता 7 वी, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्रा. शा. कुडवा, गोंदिया (राज्य रँक 3)
2) लक्ष हुमेन्द्रकुमार खोटेले, इयत्ता 7 वी, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्रा. शा. कुडवा, गोंदिया (राज्य रँक 3)
3) कु. निराली मनिष चापले, इयत्ता 5 वी, PMSHRI राणी अवंतिबाई न. प. प्रा. शा. लोधीटोला तिरोडा (राज्य रँक 1)







