प्रेरण कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन गुणवंत विद्यार्थी घडवा – राजकुमार हिवारे, प्राचार्य डायट.
🛑 डायट गोंदिया येथे 7 दिवशीय नवनियुक्त शिक्षक प्रेरण प्रशिक्षणाला सुरुवात; 109 प्रशिक्षणार्थी घेत आहेत 6 सुलभकांकडून विविध विषयांचे धडे.

🛑 डायट गोंदिया येथे 7 दिवशीय नवनियुक्त शिक्षक प्रेरण प्रशिक्षणाला सुरुवात; 109 प्रशिक्षणार्थी घेत आहेत 6 सुलभकांकडून विविध विषयांचे धडे.
गोंदिया, (दि.26): राज्यातील शिक्षण विभागात पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त भरती झालेल्या शिक्षकांचे सात दिवसीय प्रेरण ( इंडक्शन प्रोग्राम) प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारा प्रत्येक जिल्ह्यात सात दिवशी प्रशिक्षण घेण्याचे निर्देश प्राप्त झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या ठिकाणी दिनांक 25 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राजकुमार हिवारे यांनी या प्रेरण प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन गुणवंत विद्यार्थी घडवावे असे उपस्थित शिक्षकांना आवाहन केले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांमध्ये सत्र 2025-26 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त 109 शिक्षक हे प्रेरण प्रशिक्षणाला उपस्थित असून प्रशिक्षण जिल्हा समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य यांच्या मार्गदर्शनात मिनाक्षी कटरे, मुकेश रहांगडाले, सुनील हरिनखेडे, वशिष्ट खोब्रागडे, प्रदीप शरणागत, अंकला माने व दिनेश उके हे सुलभकांचे कार्य करीत आहेत. या प्रशिक्षणात NEP 2020, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, निपुण भारत अभियान, समावेशित शिक्षण व वंचिताचे शिक्षण, वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश, विद्यार्थी लाभच्या योजना, अध्यापन पद्धतीची स्वायतता, शालेय विविध स्पर्धा परीक्षा, कला व क्रीडा, कथाकथन व अनुभवाधारित शिक्षण, मूल्यमापन व मूल्यांकन प्रक्रिया, CCE, HPC इत्यादी विषयावर सखोल असे मार्गदर्शन होणार आहे.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी साधनव्यक्ती वशिष्ट खोब्रागडे, रवी पटले, ओमप्रकाश ठाकरे, बी डी चौधरी, अनिता ठेंगडी, राजकुमार गौतम, भास्कर बाहेकर, कार्यालयीन कर्मचारी दिनेश बुरबंधे, अभय येनुगवार हे सहकार्य करत आहेत.







