सामाजिक

अनाथ, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लेकरांसाठी ‘दिवाळी उत्सव: एक दिवा मानवतेचा’ उपक्रम; जिल्ह्यातील अनाथ बालकांना दिवाळी फराळ व साहित्य वाटप. 

🛑 वशिष्ठ खोब्रागडे व मित्र परिवाराकडून 39954 रु. ची भेट..

🎇 दिवाळीचा खरा अर्थ – माणुसकीचा प्रकाश उजळवणारी ‘सविता बेदरकर’ यांची समाजसेवेची दिवाळी…

गोंदिया (प्रतिनिधी) :दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि गोडधोड सण! परंतु समाजाच्या एका कोपऱ्यात असेही अनेक जीव आहेत — ज्यांच्याकडे ना कुटुंबाची साथ, ना सणाची उब. अनाथ, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी डॉ. सविता बेदरकर यांनी ‘एक दिवा मनावतेचा’ या भावस्पर्शी उपक्रमातून खऱ्या अर्थाने माणुसकीचा प्रकाश पेटवला आहे.

             दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बेदरकर यांच्या सिव्हिल लाईन, गोंदिया येथील निवासस्थानी ‘दिवाळी मिलन समारोह’ (दि.19) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला समाजातील विविध क्षेत्रातील शिक्षक, अधिकारी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संकलित झालेल्या निधीतून अनाथ, अपंग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना नवीन कपडे, मिठाई, गोडधोड, पॉकेटमनी आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

             त्यांच्या या उपक्रमात दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही अनेक दानशूर व्यक्ती स्वतःहून सहभागी झाले. वर्षभर अनाथ मुलांना अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य पुरवणाऱ्या सविता बेदरकर दिवाळीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची जबाबदारीही मनापासून पार पाडतात. त्यामुळेच त्यांना गोंदिया जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात ‘अनाथांची माय’ म्हणून संबोधिले जाते. त्यांच्या या कार्यात समाजातील अनेक दानशूर व्यक्ती सहभागी होऊन आर्थिक व विविध वस्तुरूपात मदत करतात.

यामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती पुढे आले आमदार विनोद अग्रवाल व सविता अग्रवाल, सुनील केलंनका, कमल हटवार, डॉ. रवी धकाते, कमलेश नशीने, सुरेखा ठकरेले, छैलबिहारी अग्रवाल, दिव्या भगत, सावन बहेकार, रत्नसेन डहाट, भरत फेंडर, तिलक लारोकर, सुनिता भेलावे, नाननबाई बिसेन, विजय नागपुरे, विजय बहेकार, सुनील तरोणे, संदीप जैन, देवयानी लोखंडे, डॉ. सचिन केलनका, से. नि. शि. महेंद्र सोनेवाने व यशोधरा सोनवाने, सेवा निवृत्त गशिअ कुसुम पुसाम, डॉ. कापगते मॅडम, श्री कापगते, से.नि. प्रा. अनिल मेश्राम सर, अहमद मणीयार, मधुसूदन तरोणे, सी. ए .निखाडे, भगवान नंदागवळी, प्राची व प्रमोद गुडदे, मंजू शिवणकर, से. नि. शि. मनोज राहंगडाले, वर्षा भांडारकर, आशा नागपुरे, शिक्षक सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, सन्नी स्टोअर्स, रेणू डोंगरे, डॉ. सुजाता ताराम, डॉ . पाचे, डॉ. महेंद्र गजभिये, वंदना लांजेवार, प्रा. प्रकाश काशीवार आरती चवारे, नुतन खोब्रागडे, सई अभिमन्यु काळे, रूपाली सेलोकर, सुनील बुरांडे, प्रीती जेंगठे (यादी मोठी आहे ) इत्यादी मान्यवरांनी आर्थिक मदत केली. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अनिल मेश्राम यांनी केले.  कार्यक्रमाचे संचालन शालू कृपाले यांनी तर आभार यशोधरा सोनवाने यांनी मानले. 

 

वशिष्ठ खोब्रागडे व मित्रपरिवार यांनी केली 39954/- रु. मदत :

         समग्र शिक्षा कर्मचारी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे कार्यरत असलेले व समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असलेले, जैन कलार समाज युवा समितीचे सदस्य, सृजन सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष, ध्येय एज्युकेशन फॉउंडेशन चे जिल्हाप्रमुख, महासत्ता डिजिटल न्यूज पोर्टल चे संपादक वशिष्ठ खोब्रागडे हे देखील दरवर्षीप्रमाणे या अनाथ मुलांसाठी आपल्या मित्रमंडळींना सोशल मीडियाद्वारे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व मित्रमंडळीकडून 39954/- रुपये गोळा केले. ती सर्व रक्कम चेक व बँक खातेद्वारे डॉ. सविता बेदरकर यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. या कामी त्यांना DIET प्राचार्य राजकुमार हिवारे, ग.शि.अ. एम. एल. मेश्राम, शिक्षक असीम बॅनर्जी, प्रकाशजी कुंभारे (आमगाव), आदर्श शिक्षिका ममता पटले /येडे मॅडम, सुनिता वशिष्ट खोब्रागडे, से. नि. शि. वि. अधि. धनपाल (डी. टी) कावळे,  दिनेश्वरी भेंडारकर, गुंजन मिस्त्री / मंडल, जयश्री सिरसाटे मॅडम, प्रतिमा खोब्रागडे मॅडम, ब्रजेश मिश्रा  (RP), सचिन कडलग  (RP), MNC मुंबई, शिक्षक सचिन राऊत, संदीप मेश्राम, शारदा जिभकाटे/कापसे (RP), शिक्षक आर. के. नंदागवळी, आर. आय. रहांगडाले, गोरेगाव, D. Ed. कॉलेज  प्राध्यापक श्रद्धा निनावे/ बोरीकर, उर्मिला वैद्य (RP), शिक्षक रामेश्वर बागडे, योगेश जगणे, सुबीरकुमार चौधरी, महेशकुमार बिसेन (अ. इ.प. विद्या.), नीतू डहाट /दुर्गे मॅडम, शिल्पा ठाकरे मॅडम, ब्रम्हपुरी, योगेश जी असाटी, (शृंगार ज्वेलर्स), आमगाव, विशेष शिक्षक दीपा बिसेन, दिपरेखा तूरकर मॅडम (नागपूर), श्रीकांत कामडी सर, रविशंकर पटले, (RP) गोंदिया इत्यादिंनी आर्थिक मदत केली…

या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की — दिवाळी फक्त घरातील दिव्यांनीच नव्हे, तर माणुसकीच्या उजेडानेही उजळते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.